Translator

क्र (१६) शिवकांची आणि विष्णुकांचीच्या जहागिरीचा प्रश्नरामेश्वरानजिक शिवकांची व विष्णुकांची अशी दोन गावे आहेत दोन्ही गावे वैष्णवांस इनाम म्हणून दिली होती सरकारातून गावचे इनामासंबंधाने कागदपत्र हजर करावे न केल्यास दोन्ही गावे जप्त केली जातील असा वैष्णवास हुकूम आला परंतु वैष्णवाकडे तशी कागदपत्रे नव्हती म्हणून दोन्ही गावे जप्त होऊन उत्पन्नही सरकारजमा झाले वैष्णवांच्या डोळ्यावरील जहागिरीचा धूर नाहीसा होऊन ते चिंतेत पडले त्यांना काही उपाय सुचेना तेव्हा त्यांना शिवकांचीत असलेल्या श्री स्वामी समर्थांची आठवण झाली सर्व वैष्णव त्यांच्या दर्शनास आले त्यांना साष्टंग नमस्कार करुन प्रार्थना करु लागले की महाराज ही दोन गावे वंशपरंपरेने आम्हास इनाम मिळाली होती परंतु त्या संबंधाच्या सनदा (कागदपत्र )आमच्या जवळ नसल्यामुळे ती दोन्ही गावे सरकारजमा झाली आहेत महाराज आमची उपासमार होत आहे तरी या संकटावर काही तरी उपाय सांगा अशी प्रार्थना करुन त्यांनी श्री स्वामींचे पाय धरले श्री स्वामी समर्थांनी वैष्णवांकरवी त्या सर्व आधिकार्यास बोलाविले त्या आधिकार्यांना महाराज म्हणाले काय रे आमची गावे जप्त करुन आम्हास उपाशी मारता काय त्यावर आधिकारी उत्तरले महाराज सरकारचा हुकूम आहे की या दोन गावासंबंधीची कागदपत्रे दाखविल्यास गावे सोडून देऊ त्यावर श्री स्वामी समर्थ म्हणाले जा या समोरच्या नदीत एक मोठा दगड आहे त्यावर लिहिले आहे ते पाहा श्री स्वामींच्या आदेशानुसार त्या आधिकार्यांनी नदीतील तो दगड काढून वाचला तर त्यावर शके संवत्सर मास तिथी वार मूळ पुरुषाचे नाव कोणी कोणास इनाम दिले का दिले अशी सर्व हकीकत लिहिलेली पाहून सर्वांस आश्चर्य वाटले आम्ही जप्त केलेली गावे सोडून देत आहोत असे सांगून ते आधिकारी निघून गेले वैष्णवांनी श्री स्वामींची षोडशोपचारे पूजा नैवेद्य करुन श्री स्वामी नामाचा जयजयकार करीत ते आनंदाने घरी गेले 


बोध/ अर्थ / मथितार्थ

अशक्यही शक्य करतील स्वामी या तारक मंत्रातील प्रचिती दाखविणारी ही लीला आहे नदीपात्रात असलेल्या मोठ्या दगडावर सनदेतील सर्व मजकूर तपशीलवार जसाच्या तसाच आढळणे सरकारी आधिकार्यांनी तो मान्य करणे हे सर्वच श्री स्वामींची लीला किती अतक्य आहे असेच म्हणावयास लावणारी आहे या लीलेत शिवकांची आणि विष्णुकांची गावच्या जहागिरदारांच्या डोळ्यावर सत्ता संपत्तीचा धूर आला होता म्हणून सरकारने हस्तक्षेप करुन दोन्हीही वैष्णास इनाम दिलेली जहागिरीची गावे जप्त केली त्यामुळे वैष्णवांची मोठी अडचण झाली व त्यांची उपासमार होऊ लागली जहागिरीच्या वैभवात आणि सत्तेत असताना शिवकांचीतच असलेल्या त्या वैष्णवांना श्री स्वामी समर्थांचा विसर पडला होता आता ते संकटात सापडले होते विसर पडेलेल्या देवाची आता त्यांना तीव्रतेने आठवण होऊ लागली सदा सर्वदा सुख दुःखात तुझा आठव व्हावा हा उपासनेतला नियम आहे पण अनेकांना सुख समृद्धी आनंद समाधान असताना देव आठवत नाही सुखासीन असल्यावर अनेकजण देवाच्या बाबतीत उदासीन होतात त्यांना श्री स्वामीकृपेने जप्त झालेली ती गावे मिळाली त्या संदर्भात अगदी अशक्यप्राय लीला श्री स्वामींनी केली नदीतील दगड त्यावरील मजकूर तोही पाण्यात अगदी जसाच्या तसाच सविस्तर शके संवत्सर मास तिथी वार मूळ पुरुषाचे नाव इ.सह सारेच अतक्य अशक्य पण तेही श्री स्वामींनी शक्य करुन दाखविले शरणागत वैष्णास अभय देऊन त्यांना वाचविले हीच तर स्वामी कृपेची किमया या लीलेत हतबल झालेल्या वैष्णवांना तो फटका बसला

श्री स्वामी समर्थ 


ह्या ब्लॉगशी संबंधित लिंक खालीलप्रमाणे...

दत्तप्रबोधिनीची स्वामीमय सामूहिक रात्रप्रहर सेवा - शेलू ( मुंबई - पुणे )

श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचा सुक्ष्मपाठ कसा करावा - Step by step

श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुचरित्राच्या ( Shri Gurucharitra ) सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण - Step by step

स्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly

नामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....?- Read right Now


स्वामीमय रात्रप्रहर सेवेत सहभागी होण्याकरिता स्वामी स्थानी कसे पोहोचाल ?

अधिक माहिती लिंक


Our Sadhak Reviews on Google !स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज