Translator

क्र (२८५) भक्ती असावी विष्णूपंतासारखी


एकदा चिंतोपंत टोळाच्या घरी श्री स्वामी समर्थ भोजनास आले टोळांनी श्री स्वामींस स्नान घालून यथासांग पूजन करुन भोजनास पात्र वाढले पण महाराज जेवेनात दहा वाजून गेले चिंतोपंताचा मुलगा विष्णूपंत सोलापूर दप्तर कचेरीत कारकून होता गोलटपीट साहेब कलेक्टर होते हणमंतराव पीतांबर दप्तरदार होते दोघेही अधिकारी फार कडक होते सर्व कारकुनांनी बरोबर दहा वाजता कचेरीत यावे असा करडा नियम होता तेव्हा चिंतोपंतांनी चिरंजीवास सांगितले तुला कचेरीत जावयाचे आहे तर तू घरात जाऊन जेवण उरकून घे आणि जा पण विष्णूपंत भक्तिमान होते त्यांनी निश्चय केला की महाराजांनी भोजन केल्याशिवाय अन्न घ्यावयाचे नाही जे व्हायचे असेल ते होईल अकरा वाजण्याच्या सुमारास महाराज भोजन करु लागले मग विष्णूपंतही भोजन आटोपून लगबगीने कचेरीत गेले बाळकृष्ण देवराव हे हेडक्लार्क म्हणून हजेरी भरण्याचे काम पाहत होते विष्णूपंत आपणास उशीर झाला म्हणून रदबदली करण्यास हेडक्लार्ककडे गेले विष्णूपंताची विनंती ऐकून हेडक्लार्क देवरावास आश्चर्य वाटले व ते विष्णूपंतास म्हणाले तुम्ही आज माझे अगोदर कचेरीत आला असून तुमची हजेरी पूर्वीच भरली आहे तसे त्यांनी हजेरीबुक उघडून विष्णूपंतास दाखविले विष्णूपंतास मोठे आश्चर्य वाटले.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

या लीलाभागात चिंतोपंत टोळ आणि त्यांचे चिरंजीव विष्णूपंत टोळ अशी दोन पात्रे वाचण्यात येतात दोघांच्याही परमेश्वराविषयक वृत्तीतील दृष्टीकोनातील फरक स्पष्टपणे येथे दिसून येतो चिंतोपंतांची परमेश्वर भक्ती अपरिपक्व ठिसूळ स्वतःच्या सोयीनुसार काहीशी दिखाऊ स्वरुपाची होती याउलट त्यांचा मुलगा विष्णूपंत याची परमेश्वर भक्ती परिपक्व एकनिष्ठ अविचल आणि अव्यभिचारी होती त्यापुढे त्यास त्याच्या नोकरीचीही तमा वाटत नव्हती नोकरी देणारेही श्री स्वामी महाराज आणि ती काढून घेणारेही तेच अशीच त्यांची ठाम धारणा होती म्हणूनच वडील चिंतोपंतांनी श्री स्वामींच्या भोजनापूर्वी भोजन करुन घेण्याचा दिलेला सल्ला त्यांच्या मुलाने धुडकावून लावला त्याची कसोटीच होती तो कसोटीस पुरेपूर उतरला येथे विष्णूपंतासारखी अव्यभिचारी परमेश्वर निष्ठा असलेली माणसे आपल्या अवती भवती फारच कमी याउलट चिंतोपंतासारखी मात्र उदंड सोयीने जमेल तसे वागणारे पण आपण आध्यात्मिक आहोत असे दाखविणारेच फार जे व्हायचे ते होईल या भावनेने श्री स्वामींवर भरवसा ठेवून कचेरीत उशिरा गेला तर त्यास तुम्ही माझे अगोदर आलात तुमची हजेरी पूर्वीच भरली आहे असे सांगण्यात आले देव भक्ताची अशीच कसोटी पाहत असतो पण भक्ताची काळजी तो घेत असतो सद्यःस्थितीतही विशुद्ध भक्ती असेल तर हस्ते परहस्ते कळत नकळत परमेश्वराची मदत होतच असते फक्त आपली भक्ती विष्णूपंत टोळ दामाजीपंत देवमामलेदार चोखामेळा गोराकुंभार सावतामाळी सेनान्हावी कान्होपात्रा मिराबाई संत सखुबाई जनाबाई इ.सारखी असावी ती चिंतोपंत आप्पा टोळासारखी नसावी हा इथला अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

ह्या ब्लॉगशी संबंधित लिंक खालीलप्रमाणे...

दत्तप्रबोधिनीची स्वामीमय सामूहिक रात्रप्रहर सेवा - शेलू ( मुंबई - पुणे )

श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचा सुक्ष्मपाठ कसा करावा - Step by step

श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुचरित्राच्या ( Shri Gurucharitra ) सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण - Step by step

स्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly

नामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....?- Read right Now


स्वामीमय रात्रप्रहर सेवेत सहभागी होण्याकरिता स्वामी स्थानी कसे पोहोचाल ?

अधिक माहिती लिंक


Our Sadhak Reviews on Google !स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज