Translator

क्र (२८७) हे साधू खरे कशावरुन ?


श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात आल्यावर आपल्या गावात कोणी साधू आले असल्याची हकिकत श्रीमंत मालोजीराजाचे सेवकांनी राजास सांगितली राजांनी त्यास उत्तर दिले साधू खरे कशावरून म्हणावे आता त्यांनी दर्शन दिल्यास आम्ही त्यास खरे साधू म्हणू राजा इतके बोलण्याचा उशीर तो दिगंबर स्वामीराज राजापुढे येऊन उभे राहिले राजास मोठे आश्चर्य वाटले राजाने मनोभावे श्री स्वामींचे दर्शन घेतले पुढे काही वेळाने श्री स्वामी महाराज उठून गेले.अर्थ भावार्थ मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांनी आपले अवलियापण देवत्व गाव वेशीसमोर असलेल्या फाटकातील रिसालदार अहमद अली खानास दाखवले होते म्हणून त्याने मोठ्या उत्सुकतेने कोणी महान साधू अक्कलकोटात आल्याची हकिकत श्रीमंत मालोजीराजास सांगितली त्या सर्व सामान्य सेवकावर साधूच्या खरेपणाबद्दल कसा विश्वास ठेवणार पण अहमद अलीखानास साधूच्या खरेपणाचा अनुभव याचि देही याचि डोळा आला होता अजून तो राजास यावयाचा होता मालोजीराजांच्या दृष्टीने त्यांनी ऐकलेल्या पाहिलेल्या अथवा अनुभवलेल्या भोंदू साधू पैकीच हा देखील एक असावा त्याबद्दलच हा नोकर सांगत असावा नाही तरी नोकराची समज तरी काय असते असे राजास वाटणे साहजिक होते म्हणून श्रीमंत मालोजीराजे म्हणाले साधू खरे कशावरून म्हणावे आता त्यांनी दर्शन दिल्यास आम्ही त्यास खरे साधू म्हणू राजाच्या या संशयात शंकेत तशी काहीच चूक नव्हती काही गोष्टीस साक्षित्वाची पुराव्याची अनुभूतीची अथवा प्रचितीची आवश्यकता असते म्हणून राजाच्या या उदगारात तसे काही गैरही नव्हते सूक्ष्मातल्या सूक्ष्म संवेदना भावभावनांच्या शब्दांच्या बोलण्याच्या लहरी वा स्पंदने क्षणात पकडणार्या श्री स्वामी समर्थांना राजाचे बोलणे कळण्यास उशीर तो काय लागणार राजाचे बोलणे संपते न संपते तोच दिगंबर स्वामीराज दोन्ही कर कटेवर ठेवून पंढरपूरच्या भावमुद्रेत राजाच्या पुढे येऊन उभे राहिले राजा आश्चर्यचकित झाला दिव्यत्वाची त्यास प्रत्यक्ष प्रचिती आली आपोआपच त्याचे हात जोडले गेले श्री स्वामी समर्थांचे मंगल दर्शन त्याने घेतले थोड्याच वेळात स्वामी तेथून उठून गेले श्री स्वामींच्या सामर्थ्याची मालोजी राजांची शंका निरसन करणारी ही लीला आहे हे तेव्हा घडले आता सद्यःस्थितीत वरील लीलेसारखे जसेच्या तसेच घडण्याची अपेक्षा करणे गैर आहे पण पूर्वप्रारब्ध बलवत्तर असेल सेवाभावी वृत्ती असेल निर्मोही साधना असेल कोणत्या ना कोणत्या स्वरुपात श्री स्वामी समर्थ भेटणार दर्शन देणार कुणाच्याही माध्यमातून प्रसंग घटनांतून हा इथला अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

ह्या ब्लॉगशी संबंधित लिंक खालीलप्रमाणे...

दत्तप्रबोधिनीची स्वामीमय सामूहिक रात्रप्रहर सेवा - शेलू ( मुंबई - पुणे )

श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचा सुक्ष्मपाठ कसा करावा - Step by step

श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुचरित्राच्या ( Shri Gurucharitra ) सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण - Step by step

स्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly

नामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....?- Read right Now


स्वामीमय रात्रप्रहर सेवेत सहभागी होण्याकरिता स्वामी स्थानी कसे पोहोचाल ?

अधिक माहिती लिंक


Our Sadhak Reviews on Google !स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज