Translator

क्र (२८८) अरे ! इकडे ये.


काही दिवसांनी मुंबईचे गव्हर्नरसाहेब सोलापूरात आले होते त्यांनी संस्थानचे कामासंबंधाने मालोजी राजास सोलापूरला बोलावले राजाने त्यांचे कारभारी चिंतोपंत टोळास बरोबर घेतले टोळाने राजेसाहेबास सुचविले आपणास राजकीय कामास जावयाचे आहे तर चोळाप्पाचे घरी जे साधू आहेत त्यांचे दर्शन घेऊन जावे राजेसाहेबांनी टोळाच्या या सूचनेस रुकार दिला मेण्यातून उतरुन महाराजांच्या दर्शनास गेले तर त्यांची कडक मुद्र पाहून राजास त्यांच्यापुढे जाण्याचे धैर्य होईना अरे इकडे ये असे म्हणून महाराजांनी राजास हाक मारल्यावर त्याने आत जाऊन महाराजांचे दर्शन घेतले तितक्यात महाराजांनी शिपायाच्या हातात असलेली तलवार घेऊन राजाच्या हातात दिली हुजर्याच्या हातात असलेली पिकदाणीही राजास दिली नंतर राजेसाहेब व चिंतोपंत टोळ महाराजांचे दर्शन घेऊन सोलापूरास आले गव्हर्नरसाहेब जाण्याच्या गडबडीत असल्यामुळे राजास तोफांची सरबत्ती व इतर इतमाम मिळावयास हवा होता तो मिळाला नाही त्यामुळे राजास वाईट वाटले गव्हर्नर व राजा यांच्या मुलाखती होऊन हत्यारे बाळगण्यासंबंधात संस्थानात जी बंदी झाली होती त्यावर विचार करुन गव्हर्नरने पूर्ववत हत्याराची मोकळीक दिली होती.अर्थ भावार्थ मथितार्थ 

श्री स्वामी समर्थ हे त्रिकालज्ञानी असल्याच्या अनेक लीला त्यांच्या समग्र अवतार कार्यात विखुरलेल्या आहेत त्या लीलांमध्ये भविष्यात घडणाऱ्या अनेक घटनांची सूचक कृती करुन बर्याच चांगल्या वाईट गोष्टींचे संकेत त्यांनी दिलेले आहेत त्यांच्या या संकेताचा बारकाईने विचार करुन सावध होणे आवश्यक आहे सदेह सगुण स्वरुपात वावरताना ते शुभ अशुभ संकेत देत तसेच संकेत सध्याच्या २१ व्या शतकातसुद्धा ते देतात निर्गुण निराकार स्वरुपात ते आजही मैं गया नही जिंदा हूँ याची प्रचिती देतात त्यांची निःस्सीम सेवा करणाऱ्यांस ते आजही मार्गदर्शन करतात असा अनेकांचा अनुभव आहे या संदर्भात सविस्तर वृत्त याच ग्रंथात ईतरत्र आलेले आहे या लीला कथेत मालोजीराजास सोलापूरला गेल्या नंतर काय घडेल हे त्यांनी अगोदरच सूचित केले होते पण ते जाणण्याचे ओळखण्याचे त्याचा मथितार्थ लावण्याचे भान ना राजास होते ना कारभारी म्हणून वावरणार्या चिंतोपंत टोळास होते कोठेही केव्हाही एखाद्या कामास जाताना वडील धार्यांना सांगून प्रसंगी त्यांना नमस्कार करुन जाण्याची त्यांचा आशीर्वाद व शुभेच्छा घेण्याची एक चांगली रीत आपल्या संस्कृतीमध्ये आहे थोरामोठ्यांचे आई वडीलांचे गुरुजनांचे आशीर्वाद (शुभेच्छा) एखाद्या कार्यास बळ देतात किमान पक्षी काही प्रसंगात त्यातील अशुभतेची कष्टाची त्रासाची तीव्रता कमी करतात म्हणून नमस्कार करण्याचा संस्कार महत्त्वाचा आहे त्या रितीरिवाजानुसारच कारभारी चिंतोपंत टोळाने मालोजी राजास महाराजांचे दर्शन घेऊन नंतरच सोलापूरास जाण्याचे सुचविले होते त्याप्रमाणे ते दोघे दर्शनास येताच श्री स्वामींना पुढे काय होणार हे अगोदरच उमजले होते त्यांची मुद्रा त्या प्रसंगी अतिशय उग्र बनली होती त्यांच्यापुढे येण्यास राजाचे धैर्य होईना तेव्हा त्यांनी राजास अरे इकडे ये अशा कणखर आवाजात बोलावले राजाच्या हातात तलवार व पिकदाणी दिली यातून त्यांनी राजास अनुकूलता आणि प्रतिकुलता सूचित केली राजा व टोळ सोलापूरास आल्यावर घडलेही तसेच अक्कलकोट संस्थानिक म्हणून मालोजी राजास मान सन्मानाची खूण म्हणून तोफांची सलामी (सरबत्ती) व इतर सन्मान मिळावयास हवा होता तो मिळाला नाही एक प्रकारे राजाचा अपमान अवमानच झाला तसा तो होणार होता हे महाराजांनी त्यांच्या हातात पिकदाणी (पान थुंकून टाकण्याचे पात्र) देऊन अगोदरच सूचित केले होते राजा व गव्हर्नर यांच्यात चर्चा होऊन संस्थानात हत्यारे बाळगण्यासंबंधी जी बंधने या अगोदर घालण्यात आली होती ती आता उठविण्यात आली साहेबांनी पूर्ववत हत्याराची मोकळिक दिली असे हे शुभकारक होणार होते हे ही महाराजांना अगोदरच ज्ञात होते म्हणून त्यांनी राजाच्या हातात तलवारही (सन्मानदर्शक) दिली श्री स्वामी समर्थ श्री गजाननमहाराज शिर्डीचे श्री साईबाबा यासारखे अवतारी पुरुष संत महात्मे आपल्या व्यवहारात लक्ष घालीत नाहीत परंतु त्यांच्या निर्मोही उपासनेने आपली कार्ये सुलभ व आनंददायी होतात हे मात्र निश्चित ते त्यातील अनुकुलता प्रतिकूलता याबाबत आवश्यक मार्गदर्शन करतात काही संकेत घटना माध्यमे यांद्वारा जागरुकही बनवतात म्हणून त्यांच्या कृपाशीर्वादासाठी नित्य नियमाने थोडी का होईना उपासना करणे आवश्यक आहे संसार प्रपंच उद्योग करताना त्यांच्याशी सदैव अनुसंधान ठेवणे हाच इथला आत्मबोध आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

ह्या ब्लॉगशी संबंधित लिंक खालीलप्रमाणे...

दत्तप्रबोधिनीची स्वामीमय सामूहिक रात्रप्रहर सेवा - शेलू ( मुंबई - पुणे )

श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचा सुक्ष्मपाठ कसा करावा - Step by step

श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुचरित्राच्या ( Shri Gurucharitra ) सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण - Step by step

स्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly

नामस्मरण म्हणजे काय, आपल्या नामस्मरण ( Namsmaran ) वाणीचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो....?- Read right Now


स्वामीमय रात्रप्रहर सेवेत सहभागी होण्याकरिता स्वामी स्थानी कसे पोहोचाल ?

अधिक माहिती लिंक


Our Sadhak Reviews on Google !स्वामीसभासद नोंदणी प्रार्थमिक अर्ज